
जिजामाता ज्यूनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा हे १२ जून १९४२ रोजी कर्मवीर अण्णांनी तत्कालन कलेक्टर हमीदअली यांच्या पत्नी शरीफा बेगम अली यांच्या आग्रहास्तव काढलेले महाराष्ट्रातील पहिले मुलींचे कॉलेज होय. सुरूवातीला हे कॉलेज बखले वाडयात भरत होते. कर्मवीरांचा एकूलता एक मुलगा श्री.आप्पासाहेब पाटील यांच्या लग्नात शाहू महाराजांनी दिलेल्या सोन्याचांदीच्या ताट भरून मोहरांचा आहेर या कॉलेजच्या उभारणीसाठी अण्णांनी दिला. त्यांच्या त्यागावरतीच आज हे कॉलेज मोठया दिमाखात व डौलात उभे आहे.