विद्यालयातील अभ्यासक्रम



१) विद्यार्थी संख्या : प्रथम वर्ष - ४० मर्यादा (Intake), द्वितीय वर्ष - ४० मर्यादा (Intake)
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविले जाते. विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया प्रथम वर्षासाठी ४० आहे.

२) फी स्ट्रक्चर :
प्रथम वर्ष - ३३०० रुपये.
द्वितीय वर्ष - ३०८० रुपये.

३) जात - संवर्ग : शासकीय नियमानुसार ठरलेल्या बिंदू प्रमाणे संवर्गानुसार अध्यापक विद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो.

४) प्रवेश पात्रता : डी. एल. एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण असुन कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य अभ्यासक्रमातील काही विषय असे आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी - ४४.५० %
खुला प्रवर्गासाठी - ४९.५० %

५) परीक्षा कालावधी : डी. एल. एड. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांचे मार्फत साधारण जून व नोव्हेंबर महिन्यात घेतली जाते.

६) अध्यापक विद्यालयाचे वार्षिक कामकाजाचे दिवस किमान २२० दिवस निश्चित केलेले आहेत.

७) डी. एल. एड. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष एकूण ८ विषय आहेत. त्यांची प्रत्येकी ६ साधनतंत्रे आहे. एकूण गुण - १००० प्रात्यक्षिक व थिअरी.
प्रथम वर्ष :
थिअरी - ३०० गुण
प्रात्यक्षिक - ७०० गुण
आंतरवासिता - १५० गुण
द्वितीय वर्ष :
थिअरी - २८० गुण
प्रात्यक्षिक - ७२० गुण
आंतरवासिता - १५० गुण
दोन्ही वर्षांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर असुन ३०० गुणांपैकी त्याचे रुपांतर द्वितीय वर्षाच्या शेवटी ५० गुणात करण्यात येते.